कुंडलवाडी ते बिलोली जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण स्टेटमेंट प्रमाणे व्हावे ह्या मागणीसाठी बिलोली शहर वासियांनी रास्ता रोको आंदोलन करुन माननीय तहसीलदार यांना निवेदन दिले.

( बिलोली.प्र – सुनिल जेठे )
बिलोली तालुक्यातील मुख्य चौरस्त हा बिलोली ते कुंडलवाडी, धर्माबाद जाणारा रस्ता हा अरुंद व अखुड असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करताना बिलोली शहरातील कांही लोकांनी काम बंद पाडले.

या विरोधात बिलोली शहरातील इतर नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाचे काम न थांबवता रस्ता रुंदीकरण व्हावे म्हणून बिलोली दि.26 डिसेंबर रोजी सकाळी रस्ता रोको आंदोलन करुन मा. तहसिलदार श्रीकांत निळे यांना निवेदन दिले.
सदरील बिलोली- कुंडलवाडी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी “नुसरत कंट्रक्शन” करखेली या गुत्तेदार यांना काम देण्यात आल्याने सदरील कुंडलवाडी पासुन बिलोली शहरातील भाजीपाला बाजार पर्यंत रस्त्ता रुंदीकरणाचे काम चालु आहे. 

त्यामुळे बिलोली शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना समजले असता त्यांनी सदरील रस्ता हा रुंदीकरण व्हावा, शहरात ट्राफिक जाम होणार नाही  म्हणून शहरातील नागरिकांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करुन तहसीलदार श्रीकांत निळे, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनावर शंकरराव अंकुशकर, अर्जुनराव अंकुशकर, धोंडीबा शंखपाळे, माधवराव जाधव, यशवंतराव गादगे, माधवराव अंकुशकर, इंद्रजित तुडमे, दिलीप उत्तरवार, बांबू कुकडे, सय्यद रियाज, सुनिल जेठे, नागेश्वर किशोड, रमेश गुडमलवाड, पोशट्टी सांरगे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या