बिलोली कुंडलवाडी रस्त्याची दयनीय अवस्था ; अर्धवट सीसी रस्त्यावर वाहनांची वर्दळ

■  रखडलेल्या सीसी रस्त्याच्या कामाकडे सा.बां.उपअभियंत्याचे दुर्लक्ष का ?

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली शहरातील कुंडलवाडी मुख्य चौकापासून ते उप जिल्हा रुग्णालया पर्यंत जागो-जागी खड्डे, अर्धवट सीसी रस्त्यात वाहनांच्या वर्दळीत नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.

अर्धवट सीसी रस्त्यामुळे जनतेला अती त्रास सहन करावा लागत आहे. बिलोली कुंडलवाडी चौक ते आठवडी बाजार पर्यंतच्या सी.सी रस्त्याचे काम केंव्हा पूर्ण होईल असा सा.बा.वि.च्या अभियंतांना प्रश्न जनतेतून केली जात आहे.

कुंडलवाडी बिलोली सी.सी रस्त्याचे गेले दोन वर्षांपासून काम चालू असलेले काम अंतीम टप्प्यात आले असता बिलोली शहरातील कांहीं व्यापाऱ्यांची दुकाने रस्त्यात येत असल्याने दूकानदारांनी आपले दुकाने वाचवण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन सी.सी रस्त्याच्या कामावर स्थगिती आणली. तर कांही व्यापाऱ्यांनी दुकानाचा रस्त्यात येत असलेला भाग काढून घेतला आहे. तर काही दुकाने रस्त्यात अजून आहेत. म्हणून रस्ता संबंधित गुत्तेदार  यांनी सी.सी रस्त्याचे अर्धवट काम रेंगाळत ठेवले. एका बाजूच्या सी.सी रस्त्यावर दुचाकी, अवजड वाहनांच्या रहदारीत नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या रखडलेल्या सी.सीर स्त्याच्या कामाकडे सा.बां.उपअभियंताचे दुर्लक्ष होते आहे?
 आता लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागलेली आचार-संहिता संपली आहे. सी.सी रस्त्याच्या कामासाठी आता अडचण नाही. अर्धवट असलेले सी.सी रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या