कुंडलवाडी शहरातील लोडशेडिंग बंद करण्याची मागणी ; काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना निवेदन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरात लोडशेडींग व इमरजन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली दिवसा व अपरात्री कधीही वीज पुरवठा खंडित केला जात आहे. खंडित करण्यात येत असलेला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावे यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
कुंडलवाडी शहरात गेल्या अनेक दिवसापासून लोडशेडिंगच्या नावाखाली वीज पुरवठा बंद करण्यात येत आहे,शहराजवळ 132 के व्ही उपकेंद्र असतानाही व शहराचे विज बिल नव्वद टक्केच्या वर वसुली असतानाही दिवसा व रात्री कधीही शहरात लोडशेडींग करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच शहरातील 132 के व्ही उपकेंद्रातून धर्माबाद शहराला वीजपुरवठा केला जात होता,पण धर्माबाद शहराला लोडशेडिंग नाही पण शहरा जवळ 132 केव्ही उपकेंद्र असूनही शहरात मात्र लोडशेडिंगच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शहरातील लोडशेडींग व इमर्जन्सी लोडशेडींग तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदनावर तालुका उपाध्यक्ष राजेश पोतनकर, शहराध्यक्ष प्रदीप आंबेकर, माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगुलवार, माजी नगरसेवक शेख मुखत्यार, हर्ष कुंडलवाडीकर, कुणाल पवारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या