कुंडलवाडीच्या सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संतोष पाटील शिवशेट्टे यांची निवड.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ] 
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडीच्या सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी संतोष पाटील शिवशेट्टे यांची निवड झाल्याबद्दल ममदापूर येथे भव्य सत्कार करण्यात आला.
बिलोली तालुक्यातील मौजे ममदापूर जन्म भुमी असलेल्या गावचे सुपुञ श्री.संतोष पाटील शिवशेट्टे यांनी थोड्याच दिवसात सामाजिक, राजकीय, व्यापार या क्षेत्रात व विविध कार्य केले असल्यामुळे त्यांची सामाजिक, राजकीय नेत्यांत सन्मानाची मोठी पकड झाली.
संतोष पाटील शिवशेट्टे यांनी सध्या भाजप मध्ये एकनिष्ठ राहुन उत्कृष्ट कामगिरी करतात म्हणून त्यांचे कुंडलवाडीच्या सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठित नागरिक व मिञ मंडळाने उत्साहाने सत्कार केला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या