कुंडलवाडी नगरपरिषदेचा देशपातळीवर विशेष पुरस्काराने सन्मानित !

• इंडियन स्वच्छता लीग स्पर्धा !!

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       केंद्र शासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवा अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धा आयोजित करण्यात आले होते,याच अनुषंगाने कुंडलवाडी नगरपरिषदेने या स्पर्धेत सहभागी होऊन शहरात उत्तम स्वच्छता ठेवल्या बद्दल केंद्र शासनाच्या वतीने दिल्ली येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या हस्ते मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोबरे यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

“केंद्र शासनाकडून मिळालेल्या सन्मानामूळे अजून खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे,या वर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सुद्धा कुंडलवाडी शहर वासीयांच्या सहकार्याने शहराला चांगला क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन,कचरा मुक्त शहर करण्यासाठी सर्व शहर वाशियांनी सहकार्य करावे.                                          – मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे
 स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा देशातील 4300 शहरांमध्ये राबविण्यात आली होती, या स्पर्धेची सुरुवात दिनांक 17 सप्टेंबर रोजी Rally of Youth for Garbage Free city या कार्यक्रमाने करण्यात आले,या स्पर्धेचा मूळ उद्देश्य ‘कचरा मुक्त शहर’ ही संकल्पना व्यापाकतेने राबविणे, शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी जनजागृती करणे असा होता,या स्पर्धे अंतर्गत कुंडलवाडी नगर परिषदेकडून Rally of Youth for Garbage Free City, हिंदवी ग्रूप कुंडलवाडी युथ रॅली, के.रामलू पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची सायकल रॅली,भोर तलाव परिसर स्वच्छता, नांदेड वेस परिसर स्वच्छता, आदींचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत कुंडलवाडी नगर परिषदेने कुंडलवाडी शहराचा ‘संघ हिंदवी ग्रूप कुंडलवाडी’ या नावाने नोंद केला होता,या स्पर्धेतुन शहरात उत्तम प्रकारे स्वच्छता ठेवल्यामुळे व स्वच्छतेचे योग्य नियोजन करुन नागरिकांचा सहभाग वाढविल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री कौशल किशोर,सचिव रूपा मिश्रा यांच्या हस्ते मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांचा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, DAO शैलेश फडसे स्वच्छ महाराष्ट्र अभियानचे संचालक समीर उन्हाळे, प्रशासक उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, यांनी मार्गदर्शन केले आहे.या पुरस्कारामुळे कुंडलवाडी शहराच्या वैभवात भर पडली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या