मयत शुभम गागदे यांच्या कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
◆ कुंडलवाडी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या वतीने दि.२१ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे संबंधित गुत्तेदाराकडुन मयत शुभम गागदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला यश आले.असुन संबंधित गुत्तेदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची दखल घेत मयत शुभम गागदे यांच्या कुटुंबाला सहानुभूती पुर्वक आर्थिक मदत केली आहे. 
———————————————————-
◆ याप्रकरणात संबंधित गुत्तेदाराची काही चुक नसुन संपूर्ण चुक ही महावितरणच्या कर्मचाऱ्याची असल्याची प्रतिक्रिया मयत शुभम गागदे यांच्या कुटुंबांनी दिली आहे.
——————————————————
 याबाबत सविस्तर वृत्त अशी की, कुंडलवाडी ते धर्माबाद या राज्य महामार्गाच्या रोडचे काम चालू असताना या राज्यमहामार्गा वरील विद्युत पोलच्या लाईन शिफ्टिंगचे काम चालू असताना यावेळी तीन तरुणांना वीजेचा शॉक लागल्यामुळे एका तरूणांचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला .तर दोन तरुणांवर उपचार करण्यात आले असुन त्यांची प्रकृती चांगली झाली असल्याची माहिती संबंधित गुत्तेदारांकडुन मिळाली आहे.
 बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी ते धर्माबाद रस्त्यावरील विद्युत लाईनचे काम गेल्या अनेक दिवसापासून एका खाजगी गुत्तेदारामार्फत चालू होते. 
दि.१८ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कुंडलवाडी ते धर्माबाद रोडवरील ३३ के.व्ही.च्या जवळ लाईन शिफ्टिंगचे काम करताना कामगार शुभम पांडुरंग घागदे वय २२ वर्ष रा . लाठ (खु) तालुका कंधार.जि.नांदेड, प्रशांत संजय बाबळे वय २० वर्ष रा., लाठ (खु) तालुका कंधार, रुधिर सुधाकर वाघमारे वय २२ वर्ष रा. पानभोशी तालुका कंधार या तरुणांना शॉक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती.
दि.१८ जुलै २०२२ रोजी शुभम पांडुरंग गागदे,वय २२वर्ष रा.मौजे लाठ (खु),पो.उस्मान नगर,ता.कंधार जि. नांदेड यांचा विजेचा शॉक लागुन मृत्यु झाला असल्याने मयत शुभम गागदे यांच्या कुटुंबाला सहानभुती पुर्वक मदत म्हणुन संबंधित ठेकेदाराकडून दि.२५ जुलै २०२२ रोजी आर्थिक मदत देण्यात आली.
असल्यामुळे मयत शुभम गागदे यांचे कुटुंब समाधान व्यक्त केले असल्याचे दिसून आले आहे. तर कुंडलवाडी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मयत शुभम गागदे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या