कुंडलवाडी घनकचरा व्यवस्थापनात मनमानी कारभार ; प्रभागातील कचरा गोळा करणाऱ्या अनेक गाड्या नादुरुस्त – नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी एका सेवाभावी संस्थेस कंत्राट दिले आहे,सदरील कंत्राटदार आपले मनमानी कारभार चालवत आहे. शहरतील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडी नादुरुस्त असून बरेच वेळेस प्रभागतील मुख्य रस्त्यावर गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्यासाठी अनियमितता होत असल्याने याचा त्रास नागरीकांना होत आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरीकाकडून होत आहे.

उमरी तालुक्यातील धानोरा येथील पल्लवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला नगरपालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिले आहे. शहरातील कचरा गोळा करून पिंपळगाव येथील चौकात डंपिंग यार्ड येथे ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण केले जाते. शहरातील प्रत्येक प्रभागात घंटा गाडी द्वारे कचरा गोळा करून पिंपळगाव येथील डंपिंग यार्ड येथे घेऊन जाणे घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराचे जबाबदारी आहे.
या साठी महिन्याकाठी सहा लाखाच्या जवळपास खर्च केला जातो. संबंधित कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे घंटा गाडी नादुरुस्त असून कचरा गोळा करत असताना वारंवार बंद पडत असतात. काही घंटागाडीला सायरन नसल्याने गाडी केंव्हा आली व केंव्हा गेली ये सुध्दा नागरीकांना कळत नाही. बरेच वेळा प्रभागातील मुख्य रस्त्यावर घंटा गाडी बंद पडल्याने रहदाऱ्यांना याचा त्रास होत आहे. दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी डिझेल संपल्यामुळे प्रभाग क्र. एक मध्ये घंटा गाडी बंद पडल्याने रहदाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे.
प्रभागातील नागरीकांच्या सहाय्याने ड्रायव्हर गाडी बाजूला घेऊन रहदाऱ्यांना रस्ता मोकळा करावा लागला. या बाबत नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्यासाठी अनियमितता होत असल्याने याचा त्रास नागरीकांना होत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या