कुंडलवाडी येथे गॅस सिंलेडरचा तुटवडा ; दहा दिवसापासून कार्यालय बंद !

एजन्सी चालका विरोधात तहसीलदार यांच्याकडे नागरीकांची तक्रार  !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      शहरात गॅस सिंलेडरचे वितरण गेल्या दहा दिवसा पासून बंद असल्याने नागरिक त्रस्त झालेआहेत.गॅस सिलेंडर वितरण चालू करण्यास संबंधित गॅस एजन्सी चालकास आदेशीत करून नागरिकांची होत असलेली गैरसोय दुर करावे,अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनद्वारे केली आहे.  
   शहरात इंडेन गॅस एजन्सी आहे सदरील गॅस एजन्सीचे मुळ चालक यांनी उमरी येथील एका व्यक्तीला गॅस एजन्सी चालवण्यास भाडेतत्त्वावर दिले आहे. सदरील गॅस सेवा जवळपास दहा दिवसा पासून बंद असल्याने कुंडलवाडी शहर परिसरातील गावातील ग्राहक वैतागले आहेत. गॅस एजन्सी कार्यालय सुध्दा बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोणासी संपर्क साधावा असा प्रश्न पडला आहे. कार्यालयातील काही कर्मचारी यांचे फोन बंद आहे तर काही कर्मचारी फोन घेत नाहीत.
गॅस वितरण कशामुळे बंद आहे याचे साधे सुचना फलक सुध्दा लावलेले नाही. तसेच गॅस वजन करुन मिळत नाही व गॅस ग्राहकांना गॅसची पावती दिली जात नाहीत. असे असंख्य नागरीकांची तक्रार आहे. संबंधित गॅस एजन्सी चालकास शासकीय नियमा प्रमाणे व त्वरित गॅस उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावे अशी मागणी निवेदनद्वारे तहसीलदार यांना करण्यात आला आहे. निवेदनावर शिवकुमार शंकर गंगोने, विनोद धोंडिबा काळेवार, शेख अहमद बाबू, राजशेखर सायलू माहेवार, श्रीनिवास गंगाधर मंडगे आदींचे स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या