कुंडलवाडीत घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप ; बहुचर्चित प्रलंबित असलेल्या 197 घरकुल लाभार्थ्यांना अखेर मिळाले धनादेश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील नगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील 197 घरकुल लाभार्थ्यांना दिनांक 1 फेब्रुवारी रोजी विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.

कुंडलवाडी नगरपरिषदे अंतर्गत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत तत्कालीन भाजपा सत्ताधाऱ्यांनी 1304 घरकुले मंजूर करून आणले होते. तदनंतर 1 ऑक्टोबर 2020 रोजी नगरपरिषदेत सत्तांतर होऊन महविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर तत्कालीन भाजपच्या साडेतीन वर्षाच्या सत्तेच्या काळात घरकुल योजनेतील ‘विस्तृत प्रकल्प अहवाल’ अर्थात डीपीआर मधील 197 लाभार्थ्यांना घरकुलासाठी बांधकाम परवानगी न देता काही लाभार्थ्यांना ज्यांचे नाव पहिल्या डीपीआर मध्ये नसतानाही भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी नियमबाह्य रित्या घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, हप्त्याच्या धनादेशाचे वितरण करण्यात आल्याचे उघड झाले.
त्यानंतर 197 लाभार्थ्यांची नावे पहिल्या डीपीआर मध्ये नसल्याने घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे लाभार्थ्यांना चोथा हप्ता देण्यासाठी प्रशासना समोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार व महविकास आघाडीचे नगरसेवक यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना भेटून त्यांच्या माध्यमातून राज्य सनियंत्रण समिती व केंद्र सरकारची सनियंत्रण समिती यांच्या माध्यमातून 197 लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावाची नव्याने अंतिम मान्यता घेऊन धनादेश वाटपाचा प्रश्न सोडवीला आहे.
संबंधित लाभार्थ्यांना नगरपालिकेच्या प्रांगणात दिनांक 1 फेब्रुवारी रोजी धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, माजी नगराध्यक्ष डॉ एस एस शेंगुलवार, सुनील बेजगमवार, सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार, उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार, नगरसेवक शंकर गोनेलवार, शेख मुख्तार, सुरेश कोंडावार, नगरसेवक प्रतिनिधी गंगाधर खेळगे, पोशटी पडकुटलावार, संजय भास्कर, हर्ष कुंडलवाडीकर, व्यंकट शीरामे, पानसरे महाविद्यालयचे उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप आंबेकर, काँग्रेस युवक शहराध्यक्ष सिराज पट्टेदार, राजेश पोतनकर, प्रकाश अर्जुने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे, शिवसेना शहराध्यक्ष शंकर कोनेरवार, मारोती शंखतीर्थकर, राम रत्नागिरे, भीम पोतनकर, नरेश सब्बनवार, रमेश करपे, साईनाथ दाचावार आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या