कुंडलवाडी – हुनगुंदा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ; बसव ब्रिगेडच्या वतीने आमदार अंतापुरकर यांना निवेदन

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
• कुंडलवाडी – हुनगुंदा या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था होऊन “रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता “अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे संबंधित रस्ता तात्काळ दुरुस्ती करावे अशी मागणी बसव ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ओमराज पाटील भाले यांनी आमदार जितेश अंतापुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे….

• कुंडलवाडी – हुनगुंदा हा चार किमी अंतराचा असलेला रस्ता आहे,या रस्त्याच्या मार्गावरून मनूर, बामणी, संगम, हुनगुंदा, ममदापूर आदी गावातील नागरिक मुख्य बाजारपेठ असलेल्या कुंडलवाडी शहरात मोठ्या प्रमाणात ये जा करीत असतात.याच मार्गावर संगम हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची ही वर्दळ असते तर तेलंगणा राज्यात जाण्यासाठी या मार्गाचा वापर वाहन चालक मोठ्या प्रमाणात करीत असतात.

सदरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळणी होऊन वाहन चालक,रुग्ण,गरोदर माता,शाळकरी मुले,आदींना नाहक त्रास सहन करत आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सदरील रस्ता तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष ओमराज पाटील भाले यांनी आमदार जितेश अंतापुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे …….
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या