कुंडलवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील बसस्थानक जवळील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात विसावा अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे.
अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात ९ आँगस्ट रोजी झाली असून १६ आँगस्ट रोजी सांगता होणार आहे. दि.९ आँगस्ट रोजी श्री.ह.भ.प.श्रीधर महाराज कासराळीकर यांचे भजन, दि.१० आँगस्ट रोजी श्री.ह.भ.प.मोहनराव कावडे गुरुजी हसनाळीकर यांचे भजन, दि.११ आँगस्ट रोजी श्री.ह.भ.प.रमेश महाराज माऊलीकर यांचे भजन, दि.१२ श्री. ह.भ.प.शंकर महाराज खिसे इब्राहीमपुरकर यांचे भजन, दि.१३ आँगस्ट रोजी श्री.ह.भ.प.बाबु महाराज आंदेगांवकर, श्री.ह.भ.प.गंगुबाई कारीनारी लक्ष्मी गिराम ता.बार्शी,श्री.रामजी महाराज आंदेगांवकर बारूड यांचा भारूडाचा सामना, दि.१४ आँगस्ट श्री.ह.भ.प.बाळकिर्तनकार प्रबोधन महाराज अभंगराव पंढरपुरकर यांचे भजन, दि.१५ आँगस्ट श्री.ह.भ.प.पंढरपुरकर श्री संतोष महाराज यांचे भजन दि.१६ आँगस्ट व श्री.ह.भ.प.पंढरपुरकर श्री संतोष महाराज यांचे काल्याचे किर्तन नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचा शहर व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या