कुंडलवाडी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ कुंडलवाडी- अमरनाथ कांबळे ]
          अंतरवाली घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतिने आज ४ सप्टेंबर रोजी कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली होती.या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मौजे अंतरवाली ता.अंबड जि.जालना येथे जे शांततेच्या मार्गाने उपोषण चालु आहे.

ते उपोषण हाणुन पाडण्यासाठी उपोषण समर्थक मराठा समाज बांधवावर पोलीसांनी अमानुषपणे लाठीमार व गोळीबार करण्यात आला.या घटनेत अनेकांना गंभीर दुःखापत झाली.

या घटनेच्या निषेधार्थ आज दि. ४ सप्टेंबर सोमवार रोजी कुंडलवाडी शहरातील बाजारपेठ सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने बंद ठेऊन त्या घटनेचा निषेध करण्यत आला.या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून बदला १०० टक्के प्रतिसाद दिला.
          बसस्थानक जवळील शिवाजी चौकातुन डॉ. हेडगेवार चौक व मुख्य बाजारपेठेत घोषणाबाजी करून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व सहकारी कर्मचाऱ्यांचे पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या