कुंडलवाडी बाजार समितीच्या सभापतीपदी बाबाराव भाले ; साईनाथ निवळे यांची उपसभापती पदी निवड !

खतगावकरांनी दुसऱ्यांदा घातली निष्ठावंताच्या गळ्यात माळ ; शिवसेनेच्या सुनील एंबडवार यांना डावलल्यामुळे शिवसेनेत नाराजगी !

कुंडलवाडी (अमरनाथ कांबळे )
           येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हि दिनांक 8 ऑक्टोबर रोजी पार पडली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवुन महायुतीचा दारुण पराभव केला आहे.दिनांक 26 रोजी दुपारी 2 वाजता सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली,त्यात सभापती पदी बाबाराव पाटील भाले तर उपसभापती पदी साईनाथ निवळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करून खतगावकरांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

           कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित संगमेश्वर शेतकरी विकास पॅनल व महायुती प्रणित कुंडलेश्वर शेतकरी विकास पॅनल यांच्या मध्ये चुरशीची लढत झाली, या लढतीत महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय मिळवुन महायुतीचा दारुण पराभव केला आहे.

तर महायुतीला फक्त हमाल मापाडी मतदारसंघात फक्त एका जागेवर विजयाचे समाधान मानावे लागले आहे.ही निवडणूक महाविकास आघाडी कडून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,आमदार जितेश अंतापूरकर तर महायुती कडून माजी आमदार सुभाष साबणे,माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी प्रतिष्ठेची केली होती पण प्रतिष्ठेच्या लढाईत मतदारांनी मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल देऊन महायुतीला स्पशेल नाकारले आहे. असे असले तरी दिनांक 26 रोजी दुपारी 2 वाजता कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडीची प्रक्रिया पार पडली.या निवड प्रक्रियेत खतगावकारांचे निष्ठावंत असलेले बाबाराव पाटील भाले यांची सभापती तर साईनाथ निवळे यांची उपसभापती पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
            लिंगायत समाजाचे असलेले बाबाराव पाटील भाले हे खतगावकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तालुक्यात सुपरिचित आहेत, त्यांच्या गळ्यात खतगावकारांनी दुसऱ्यांदा सभापती पदाची माळ टाकली तर मराठा समाजाचे नवतरुण चेहरा साईनाथ निवळे यांना उपसभापती पद देऊन लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जातीय समतोल ठेवून पुन्हा एकदा बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.शिवसेनेकडून सुनील यंबडवार यांनी सभापती किंवा उपसभापती पदाची इच्छा व्यक्त केली होती पण त्यांना डावळ्ण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
            या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण,माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार जितेश अंतापुरकर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील पाचपिपळीकर,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार,माजी उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार,संचालक राजेश्वरराव उत्तरवार,रमेश दाचावार, संतोष पाटील चंदनकर,डॉ हणमंत लखमपुरे, अशोक कदम,साईनाथ निवळे, आनंदराव पाटील शिंदे,साहेबराव शिंदे,महंमद खयूम,माधव नरवाडे, देवनबाई ढगे,सिद्धार्थ पतंगे,मेहत्रे कोंडीबा,येरकलवाड राजेंद्र,आदिसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर जी कोरवार यांनी काम पाहिले आहे..

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या