कुंडलवाडी मार्केट कमिटी निवडणुकीत भाजपाच्या विरोधात शिंदे व अजित पवार गट एकत्र !

●  ग्रामपंचायत मतदार संघात भाजप व काँग्रेसला फटका बसण्याची श्यक्यता !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक हि दिनांक 7 रोजी पार पडणार असून या निवडणुकीत भाजपाने शिवसेना (शिंदे गट)राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना उमेदवारी न दिल्याने शिंदे व अजित पवार गटाने भाजपाच्या विरोधात एकत्र येऊन वेगळी चुल मांडली असून या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ दिनांक 30 रोजी खपराळा येथे फोडला आहे.या युतीमुळे भाजप व काँग्रेसला फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

कुंडलवाडी मार्केट कमिटीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट )व राष्ट्रवादी (अजित पवार)गटाने भाजप व काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले असून खपराळा येथील सटवाई मंदिरात नारळ फोडून शिवसेना व राष्ट्रवादीने प्रचारास सुरुवात केली आहे. कुंडलवाडी मार्केट कमिटी निवडणुकीत ग्रामपंचायत मतदार संघातुन राष्ट्रवादीचे रणजित पाटील हिवराळे तर शिवसेनेकडून अंकुश पाटील हिवराळे हे निवडणूक लढवीत आहेत. या दोन तुल्यबळ उमेदवारामुळे ग्रामपंचायत मतदारसंघात भाजप व काँग्रेसचे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
यावेळी या प्रचार सभेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेश मुंढे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराप धर्माधिकारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,बहुजन नेतृत्व मंगेशभाऊ कदम,शिवसेना तालूकाप्रमुख बाबाराव रोकडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर ,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष नीलकंठ पाटील दूडले,अशोक पाटील हिवराळे,माधवराव पाटील बोगरे,माधव हिवराळे,रामेश्वर पाटील हिवराळे,भास्कर पाटील कांगठीकर शिवसेनेचे रमेश पवनकर,शहराध्यक्ष श्रीकांत गादगे,यांच्यासह अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीतील भाजप विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र महाराष्ट्रात सतेत असलेल्या महायुतीत कुंडलवाडी मार्केट कमिटी निवडणुकीत फूट पडली असून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा दिली नसल्याने महायुतीत फूट पडली आहे.

सत्ताधारी भाजपला व्यापारी गटात उमेदवार मिळाला नसल्याने काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला भाजपचा पाठिंबा आहे का? असा सवाल शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबाराव रोकडे यांनी केला आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या