कुंडलवाडी न.प.च्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार चौहान यांच्याकडे ; जिल्हाधिकारी बोरगावकर यांचे आदेश 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे बदली झाल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार बिलोली तहसीलमधील नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबत दि.६ जुन रोजी प्रभारी जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहाण यांनी मंगळवारी पदभार स्विकारला आहे.
              येथील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची 31 मे रोजी शासनाच्या नागरिकास विभागाने प्रशासकीय कारणास्तव बदली केली होती. त्यामुळे ते बदलीच्या ठिकाणी राहुरी येथे रुजू झाले होते.त्यांच्या बदलीने कुंडलवाडी येथील रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार बिलोली तहसील मधील तहसीलदार रघुनाथसिंह चौहान यांच्याकडे देण्याच्या आदेश प्रभारी जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी काढले आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या