• 17 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यकाळ संपणार.

• 18 फेब्रुवारी पासून उप विभागीय अधिकाऱ्याच्या हाती नगरपालिकेचा कारभार.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
                येथील नगरपरिषदेची मुदत दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपत असून आगामी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी बिलोली यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोविड 19 चा राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकाकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे, मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास काही कालावधी लागत आहे, त्याच अनुषंगाने कुंडलवाडी नगरपरिषदेच्या अध्यक्ष व नगरसेवक यांचा कालावधी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपत असून दिनांक 18 फेब्रुवारी 2022 पासून नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी बिलोली यांची नेमणूक निवडणूक आयोगाने केले आहे.
असे असले तरी आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून सर्वच प्रभागात सक्षम उमेदवाराची पडताळणी सुरू केली आहे तर ओबीसी समाजाच्या उमेदवारांचे लक्ष न्यायप्रविष्ट असलेल्या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या निकालाकडे लागले आहे. आज सद्यस्थितीत आठ प्रभाग 17 सदस्य नगरपरिषदेत असून आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी दहा प्रभाग 20 सदस्य असण्याची शक्यता आहे.
त्यात एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, एक ओबीसी असे तीन सदस्य संख्या नव्याने वाढण्याची दाट शक्‍यता आहे. आगामी काळात निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम कधी जाहीर करेल याकडे सर्व नागरिकांसह राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या