कुंडलवाडी नगरपरिषदेवर महिलाराज येणार ; 20 जागेसाठी सुधारित आरक्षण सोडत जाहीर !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील नगर परिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दहा प्रभागाच्या 20 जागेसाठी सुधारित आरक्षण सोडत नगर परिषदेच्या हॉलमध्ये दिनांक 28 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात आले आहे.
कुंडलवाडी नगरपरिषदेत एकूण 20 जागेसाठी 10 प्रभागाची रचना करण्यात आली असून, त्यानुसार अनु जाती 2, अनु जमाती 5, नागरिकांचा मागास प्रवर्ग 3, सर्वसाधारण 10 असे 20 जागा निश्चित करण्यात आले त्यापैकी अनु जाती 1, अनु जमाती 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग 2, सर्वसाधारण महिला 4 असे एकूण 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
■  प्रभाग निहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे :-
प्रभाग क्रमांक 01- अ) अनु जमाती सर्वसाधारण ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 02 – अ)अनुजाती महिला ब )सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 03- अ)अनुजाती सर्वसाधारण ब)सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 04 – अ)अनुजमाती सर्वसाधारण ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 05-अ)अनुजमाती महिला ब)सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 06 अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब ) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 07- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ब)सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 08 अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक09 अ)अनुजमाती महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 10 अ)अनुजमाती महिला ब)सर्वसाधारण अशा पद्धतीने प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी म्हणून श्रीमती संतोषी देवकुळे उपजिल्हाधिकारी भूसंपादन(लसिका )नांदेड त्यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी केले. यावेळी शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार,पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या