कुंडलवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन !

• सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध !
[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कुंडलवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय काम बंद आंदोलन दिनांक 31 रोजी केले आहे..
दिनांक 30 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे हे आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू व्यक्ती कडून त्यांच्यावर हल्ला झाला यात त्यांच्या हाताची बोटे कापली गेली.
तसेच डोक्याला जबर जखम झाली आहे आशा माथेफिरू विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावे यासाठी कुंडलवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार बिलोली यांना निवेदन देऊन सदरील घटनेच्या निषेधार्थ एकदिवसीय कामबंद आंदोलन केले आहे.सदरील आंदोलनात मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे,कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार,विश्वास लटपटे,गंगाधर पत्की,विरसेन सिरसाट,प्रतीक मावळदे,राम पिचकेवार,बालाजी टोपाजी,मुंजाजी रेनगडे,हेमचंद्र वाघमारे,प्रकाश भोरे,मारोती करपे, शंकर जायेवार,मोहन कंपाळे,धोंडिबा वाघमारे,महेंद्र वाघमारे, विजय वाघमारे,सय्यद माजिद,भरत काळे,रोहित हातोडे,शुभम ढिल्लोड, आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या