कुंडलवाडी – नागणी रस्त्याचे चौपदरीकरण व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी 

• हरनाळी- ममदापूर गावचे सरपंच साहेबराव शिंदे यांनी दिले तहसीलदारांना निवेदन 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      कुंडलवाडी – नागणी चार किमी अंतर असलेल्या आंतरराज्य महामार्गाच्या रस्त्याचे चौपदरीकरण,रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम, आतीवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये देण्याची मागणी हरनाळी -ममदापूर गावचे सरपंच साहेबराव पाटील शिंदे यांनी तहसीलदार बिलोली यांना निवेदनाद्वारे केली आहे…..


           कुंडलवाडी -नागणी हा रस्ता तेलंगणा या राज्याला जोडणारा आहे,या रस्त्यावर दोन ते तीन नाले असून येन पावसाळ्या अतिवृष्टी होऊन या नाल्याचे पाणी गावात शिरून गावातील नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान होत आहे.या नाल्यामुळे या रस्त्यावरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे नाल्यावर पूल बांधकाम करण्यात यावे,तसेच कुंडलवाडी – नागणी या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना, गरोदर मातांना, व रुग्णांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे,त्यामुळे कुंडलवाडी ते नागणी पुला पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे.बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून तात्काळ हेक्टरी एक लाख रुपये देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार बिलोली यांना सरपंच हरणाळी – ममदापूर गावचे साहेबराव पाटील शिंदे यांनी दिले आहे…

           सदरील मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 31 जुलै पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. या निवेदनावर सरपंच साहेबराव पाटील शिंदे, भीमराव शिंदे, जैनुद्दीन सय्यद, दिगंबर शिंदे, अहेमद सय्यद, रामचंद्र शिंदे, नागेंद्र कोपरे,आदिच्या गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत……
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या