कुंडलवाडी पोलिसांनी रेतीचा ट्रक पकडला !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरापासून जवळच असलेल्या मांजरा नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन होत आहे, त्याच अनुषंगाने दिनांक 29 रोजी रात्री एका मोठ्या ट्रकमध्ये अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदरील ट्रक पकडला आहे. त्यामुळे अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दनाणले आहेत.
कुंडलवाडी शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या मौजे नागणी येथील मांजरा नदीपात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन दररोज होत असून या सदरील गंभीर बाबीकडे महसूल प्रशासन मात्र गांधरीच्या भूमिकेत गप्प बसत असून कुठलीही कार्यवाही वाळूमाफी यावर करताना दिसून येत नाहीत त्यामुळे स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह अनेक कार्यकर्त्यांनी दिनांक 29 रोजी रात्री बाराच्या सुमारास नागणी मार्ग कुंडलवाडी येथे चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम एच 19 झेड 6500 या गाडीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरील ट्रकवर कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार बिलोली यांना पत्र व्यवहार केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांनी दिली आहे. असे असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांनी अवैध रेती वाहतूक करणारे वाहन पकडून दिल्यामुळे पोलीस व महसूल प्रशासन हे अर्थपूर्णरित्या कुंभकर्ण च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या