कुंडलवाडी पोलिस स्टेशनच्या वतीने शहरात पथसंचलन

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
        येथील पोलिस ठाण्याच्या वतीने श्री गणेश उत्सव व आगामी होणाऱ्या सण उत्सवानिमित्त शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सण उत्सव दरम्यान शहरात कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने शहरातून पथसंचल काढण्यात आले. 

       यावेळी शहरातील मुख्य मार्ग गुलजार मस्जिद, दस्तगीर गल्ली, मैनु भुसार दुकान, डॉ.हेडगेवार चौक,स्व.गोपीनाथजी मुंडे चौक,नगर परिषद मार्गे, बसस्थानक आदी मार्गाने असे पथसंचल काढण्यात आले,
        यावेळी सपोनि विश्वजीत कासले,पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोलिस हेडकॉनिस्टेबल,चव्हाण,कदम, इद्रिस बेग,शेख नजीर,पो.का चव्हाण,संजय चापलवार, बास्टेवाड,पाटील, शेख शाहिद मॅडम,श्री वास्तव मॅडम, गृह रक्षक दल, पोलिस कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या