कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी नारायण शिंदे यांची नियुक्ती ; पोलीस अधीक्षक कोकाटे यांचे आदेश

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथील पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले यांची परभणी जिल्ह्यात बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस नियंत्रण कक्षातील नारायण शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत दि.१८ जुलै रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आदेश काढले आहेत.
यापूर्वी असलेले पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले हे २५ फेब्रुवारी २०२३ रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रोजी रुजू झाले होते.पण त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची परभणी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी नव्याने आलेले पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांची कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या