सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र ; कुंडलवाडीत राजकीय समीकरण बदलणार !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष डॉ एस.एस. शेंगुलवार व भाजपाचे माजी उपध्यक्ष डॉ विठ्ठल कुडमुलवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आल्यामुळे,काँग्रेस पक्षातील गटबाजी उघड झाल्याचे दिसून आले आहे, याचा आगामी होणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीवर काय राजकीय परिणाम होतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
          कुंडलवाडी शहरात गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस व भाजपाची पक्ष बांधणी मजबूत आहे, त्यात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष डॉ एस. एस.शेंगुलवार व भाजपाचे नेते माजी उपाध्यक्ष डॉ विठ्ठल कुडमुलवार हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जायायचे,असे असले तरी गेल्या अनेक दिवसापासून डॉ शेंगुलवार हे स्थानिक पातळीवरील काँग्रेसच्या नेते मंडळीवर नाराज असल्याचे दिसून येत होते, अशा गटबाजीच्या परिस्थितीमध्येच दिनांक 13 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, या निवडणुकीत काँग्रेस व भाजप प्रणित पॅनलचे प्रतिस्पर्धी उभे करण्याची जुळवाजुळव चालू असतानाच काँग्रेसच्या नाराज असलेल्या डॉ.शेंगुलवार यांना भाजपाचे डॉ कुडमुलवार यांनी मैत्रीची टाळी देत एकत्र आले आहेत, या दोन दिग्गज नेत्यांनी एकत्र आल्यामुळे शहरातील आगामी निवडणुकीचे राजकीय गणित बिघडणार आहे.
           असे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून विविध सेवा सहकारी सोसायटीवर माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार यांचे वर्चस्व आहे,शहर व परिसरात त्यांना मानणारा शेतकऱ्यांचा एक मोठा गट आहे त्यामुळे या निवडणुकीत उत्तरवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.या अगोदर डॉ शेंगुलवार व साईनाथ उत्तरवार हे एकत्र सोसायटीवर काम पाहिले असे असले तरी डॉ शेंगुलवार हे उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला असला तरी या आगामी निवडणुकीत शेतकरी कुणाच्या बाजूने आपला कौल देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या