कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजू लाभशेटवार तर सचिव पदी अमरनाथ कांबळे यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील कुंडलवाडी मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणीची बैठक नुकतीच विश्रामगृह येथे जेष्ठ पत्रकार कल्याण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडून सर्वानुमते अध्यक्ष पदी राजू लाभशेटवार तर सचिव पदी अमरनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली.

● उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे :- 
उपाध्यक्ष दिगांबर लाडे, सहसचिव संतोष मेहरकर, कोषाध्यक्ष राजेश्वर कोलंबरे, कार्याध्यक्ष शिवमणी नागुलवार, तर सदस्य पदी एन.जी.वाघमोडे, कल्याण गायकवाड, गणेश कत्रुवार, सुभाष दरबसत्तेवार, हर्ष कुंडलवाडीकर, हरीश देशपांडे, अशोक हाके, रुपेश साठे, शेख शमशोद्दीन, वसंत मदीकुंटावार, मुकेश जोशी, नागोराव लोलापोड, सिद्धार्थ कांबळे, महंमद अफजल, संतोष चव्हाण, मजीद नांदेडकर, नागनाथ कोलंबरे, आदी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी कल्याण गायकवाड, हर्ष कुंडलवाडीकर, गणेश कत्रुवार, महंमद अफजल, नागोराव लोलापोड आदींनी मनोगत व्यक्त केले.या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वगत करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या