कुंडलवाडीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती रॅली संपन्न !

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दिनांक 3 रोजी सकाळी 11 वाजता स्पर्श कुष्ठरोग जनजागृती रॅली व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र ते नगरपरिषद पर्यंत शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून कुष्ठरोग आजाराबाबत जनजागृती रॅली काढली. या रॅलीत शहरातील मिलिंद प्राथमिक व विद्यालय, गंगाबाई पोतना सब्बनवार हायस्कूल, के.रामलू पब्लिक स्कूल,आदी शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

या रॅलीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन देवराय, वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे,समुदाय आरोग्य अधिकारी भांगे मॅडम, पाटिल मॅडम, हात्ते मॅडम, जाधव सि.एन, कुष्ठरोग तंत्रज्ञ, अनुसया जुने ,आरोग्य सेविका कल्लुरे सिस्टर, करडे सिस्टर, साठे सिस्टर, निता सिस्टर, देवकांबळे सिस्टर सिस्टर, आरोग्य सेवक गायकवाडआर.बी, डोकळे , रत्नपारखे,व प्रा.आ केंद्र अंतर्गत आशा सुपरवायझर व सर्व आशा वर्कर्स आदीसह नगरपालिका कर्मचारी,सहशिक्षक हे उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या