कुंडलवाडीत रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       येथील प्रभाग क्रमांक पाच मधील डॉ.अब्दुल कलाम चौक ते जिल्हा परिषद शाळे पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे दुरुस्ती करण्याची मागणी प्रभारी मुख्याधिकारी रघुनाथसिंह चव्हाण यांच्याकडे माजी नगरसेवक शेख मुखत्यार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

        सदरील रस्ता हा गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे सदरील रस्ता खरडून अत्यंत खड्डेमय झाला आहे, संबंधित रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी,शहरातील नागरिकासह बाहेरगावच्या नागरिकांची वर्दळ असते.

या रस्त्यावरून वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून आशा परिस्थितीत एखादा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्ती करून द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक शेख मुखत्यार यांनी प्रभारी मुख्याधिकारी रघुनाथसिंह चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या