कुंडलवाडी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड १३ मे रोजी होणार !

[ कुंडलवाडी- अमरनाथ कांबळे ]
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक १६ एप्रिल रोजी पार पडली. व या निवडणुकीत गोदावरी शेतकरी विकास पॅनलचे सर्व १३ संचालक निवडून आले. सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड शनिवार १३ मे रोजी सकाळी ११ वाजता सोसायटी कार्यालयात होणार असल्याची माहिती निर्वाचन अधिकारी आर.जी.उल्लेवार देगलूरकर यांनी दिली आहे.
कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक १६ एप्रिल रोजी पार पडली.यात गोदावरी शेतकरी विकास पॅनलचे सर्व १३ संचालक निवडून आले. यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यासाठी शनिवार १३ मे रोजी सकाळी ११ वाजता सोसायटीच्या कार्यालयात निर्वाचन अधिकारी आर.जी.उल्लेवार देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकाची सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत चेअरमन व व्हाँईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया होणार आहे. सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र विक्री, ११:३० ते १२:३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करणे व दुपारी १२ ते १२:३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेणे व दुपारी १ वाजता आवश्यकता भासल्यास मतदान व मतमोजणीची प्रक्रिया होणार असल्याची माहिती निर्वाचन अधिकारी आर.जी.उल्लेवार देगलूरकर यांनी दिली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या