कुंडलवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील बेजगमवार यांची बिनविरोध निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दिनांक 16 एप्रिल रोजी पार पडली असून या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजय झाले होते,या अनुषंगाने चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवड प्रक्रियेची बैठक दिनांक 13 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या कार्यालयात घेऊन सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील बेजगमवार तर व्हाईस चेअरमन पदी गंगाधर नरावाड यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर जी उल्लेवार यांनी दिली आहे.

                कुंडलवाडी येथील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या विविध सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही दिनांक 16 एप्रिल रोजी पार पडली, या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत गोदावरी विकास पॅनल ने 13 पैकी 13 जागा जिंकत भाजपा व काँग्रेस बंडखोर पुरस्कृत असलेल्या सोसायटीत पुनर्विकास पॅनलचा दणदणीत पराभव केला होता.
या अनुषंगाने सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीची प्रक्रिया दिनांक 13 रोजी सोसायटीच्या कार्यालयात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलावून पार पडली. या बैठकीत सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील बेजगमवार तर व्हाईस चेअरमन पदी गंगाधर नरावाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
                 यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील पाचपिपलीकर, पॅनल प्रमुख साईनाथ उत्तरवार, सुनील बेजगमवार, संचालक प्रकाश अर्जुने, कोटलावार हानमलू, गंगोणे संजय, टेकाळे गणपत,दीडशेरे चक्रधर, नरावाड गंगाधर,पाटील माधवराव, गट्टूवार धुरपतबाई,जोगदंड प्रसूधाबाई,खेळगे गंगाधर, होरके लक्ष्मण, कोमुलवार दत्ता, आदी संचालक मंडळ उपस्थित होते.
 या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ अमरनाथ राजूरकर,आ जितेश अंतापुरकर, राजेश्वर उत्तरवार, शहराध्यक्ष प्रदीप आंबेकर, राजेश पोतनकर, शेख मुखत्यार, नरेश सब्बनवार, भीम पोतनकर, साईनाथ दाचावार, सय्याराम नरावाड, संजय भास्कर, रमेश करपे, बंडू सावकार मुनगीलवार, तिरुपती गट्टूवार आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या