कुंडलवाडीत सौर ऊर्जेचे पोल बनले शोभेचे वस्तू , लाखो रुपयांचा झाला चुराडा ; प्रशासन मात्र ठेकेदारावर मेहेरबान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथील नगरपरिषद अंतर्गत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शहरात लावण्यात आलेले सौर ऊर्जा विद्युत पोल व बल्ब हे अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून बंद असलेले बल्ब व पोलवरील सौर ऊर्जा पेल्टची दुरुस्ती करून तात्काळ चालू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे…. 

            कुंडलवाडी शहरात गेल्या वर्षभरापूर्वी शहरातील आंबेडकर नगर, साठे नगर, नई आबादी, आदी ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत अंदाजे एक कोटी रुपये खर्च करून सौर ऊर्जेचे पोल बसविण्यात आले आहेत,सदरील काम नगरपरिषद प्रशासनाने युनिक इलेक्ट्रिकल्स नांदेड या कंपनीला देण्यात आले,संबंधित कंपनीच्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे सौर ऊर्जेचे बल्ब व विद्युत पोल बसल्यामुळे सहा महिन्याच्या आतच अनेक बल्ब व पोलवरील सौर ऊर्जेचे प्लेट बंद अवस्थेत पडले आहे,असे असले तरी संबंधित ठेकेदाराला प्रशासनाने किमान पाच वर्ष या सौर ऊर्जा पोलची देखभाल व दुरुस्ती करण्याची अटी व शर्ती घालून दिले असतानाही संबंधित ठेकेदाराने शासनाच्या सर्व नियमाला केराची टोपली दाखवत बंद पडलेले बल्ब व सौर ऊर्जेच्या प्लेटची दुरुस्ती अद्याप केलेले दिसून येत नाही,अशा मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाने कार्यवाही न करता त्याच्यावर मेहरबानी का ? दाखवत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

             असे असले तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ संबंधित ठेकेदाराकडून सौर ऊर्जा बल्ब व पोल सौर ऊर्जा पेल्टची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन देऊन केली आहे.या निवेदनावर शहर उपाध्यक्ष शेख इस्माईल (इशू ) गंगाधर मरकंटे,प्रल्हाद हातोडे,आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या