कुंडलवाडीत चोरट्याने फोडले बिअर शॉपीचे दुकान ; ज्वेलर्सचे दुकान व एटीएम फोडण्याचाही प्रयत्न !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगरपालिका कॉम्प्लेक्स समोरील रॉयल बियर ऍन्ड वाईन शॉपीचे दुकान दिनांक 19 व 20 जुलै रोजीच्या मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्यांनी फोडून दुकानातील विविध कंपनीचे बियर अंदाजे 4220 व गल्ल्यातील 1420 रुपये असे एकूण पाच हजार सहाशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल घेऊन गेला आहे.
        तसेच बाजारपेठेतील योगेश्वरी ज्वेलर्सचे दुकान चोरी करण्याच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न केला असून ज्वेलर्सदुकानच्या लगत असलेल्या इंडिया एटीएम मध्येही नासधुस करून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील घटनेची फिर्याद हणमलू दत्तराम कोनेरवार राहणार कुंडलवाडी यांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी श्रीनिवास पांचाळ वय 23 वर्ष राहणार कुंडलवाडी यांच्याविरुद्ध भादवी कलम 457, 380, 511,प्रमाणे लावण्यात आले आहे. सदरीलआरोपीला पोलिसांनी अटक केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे हे करीत आहेत.
         असे असले तरी कुंडलवाडी शहर व परिसरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे पोलीस प्रशासनाने शहरात रात्रीच्या वेळी गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या