कुंडलवाडीत 60 टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
              नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 27 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून एकूण 11 हजार 886 मतदाना पैकी 7 हजार 135 मतदारांनी आपल्या मताचा अधिकार बजावला आहे तर संपूर्ण शहरात 60 टक्के मतदान झाले आहे.

                   कुंडलवाडी शहरात नांदेड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील दहा बूथ वर मतदान प्रक्रिया पार पडली त्यात शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा बूथ क्रमांक 18 एकूण मतदान 1150 पैकी 692,बूथ क्रमांक 27 एकूण 1164 मतदान पैकी 731, सब्बनवार शाळा बूथ क्रमांक 26 एकूण 1092 मतदान पैकी 662, मार्केट कमिटी बूथ क्रमांक 24 एकूण मतदान 1283 पैकी 672, बूथ क्रमांक 25 एकूण 1154 मतदान पैकी 666,नगरपालिका सभागृह बूथ क्रमांक 30 एकूण 1306 मतदान पैकी 823,मिलिंद प्राथमिक शाळा बूथ क्रमांक 28 एकूण 1255 मतदान पैकी 765, बूथ क्रमांक 29 एकूण 989 मतदान पैकी 635,नगरपालिका सभागृह बूथ क्रमांक 30 एकूण 1306 मतदान पैकी 823, बूथ क्रमांक 42 एकूण 1131 मतदान पैकी 689, संस्कृतिक सभागृह एकूण 1362 मतदान पैकी 800 अश्या पद्धतीने मतदारांनी मतदान केले आहे तर शहरातील 11886 मतदाना पैकी महिला 3421, पुरुष 3714 असे 7135 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर शहरातून 60 टक्के मतदान झाले आहे.

यावेळी शहरातील दहा ही बूथ वर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे काम साहयक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांनी केले आहे..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या