कुंटूर येथे मेंढपाळ हक्क परिषद दुसरी संपन्न !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर, बरबडा, कृष्णूर, व सोमठाना, या भागातील मेंढपाळ एकत्रित येऊन मेंढपाळ हक्क परिषद कुंटूर येथे संपन्न करन्यत आले. या वेळी मा अर्जुन बबन थोरात, वैजनाथ पावडे राहुल हजारे चंद्रकांत हुलगे बालाजी पा. नारे, साहेबराव चट्टे, ज्ञानेश्वर भाऊ जोशी,रुपेशजी कुंटूरकर, शिवाजी पा होळकर, सुर्याकांत पा कादम सुर्याजी पा चाडकर, बालाजी मोहोन मद्देवाड, प्रताप कदम, उत्तम देवदे खंडेराव वडे, प्रथमेश कदम, प्रमुखांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अहिल्या देवीच्या प्रमेची पुजन करुन कार्यक्रमची सुरवात केली.
मेंढपाळांच्या न्याय व हक्काला वाचा फोडण्यासाठी मेंढपाळ आर्मी संघटनेची मराठवाडा ची दुसरी मेंढपाळ हक्क परिषद कुंटूर या ठिकाणी संपन्न झाली. या हक्क परिषदेला मराठवाडा प्रमुख पदाधिकारी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठवाडा तील मेंढपाळ तसेच मेंढपाळांच्या समस्या यावर प्रमुख पदाधिकारी यांच्यात विचारविनिमय करून मेंढपाळांच्या हिताचे ४१ठराव यामध्ये वाचन करण्यात आले. त्याच्याकडे राज्य व केंद्र सरकारने त्वरित बघावे. नाहीतर संविधानाची कलम उचलायला लावु नका असा खोचक सल्ला पदाधिकाऱ्यांनी लगावला.
येत्या काळात मेंढपाळांनी संघटित होण्याची गरज असून संघटित न झाल्यास शासकीय लाभापासून वंचित रहाल असे प्रतिपादन करण्यात आले शेळ्या मेंढ्यांचा शासकीय विमा उतरविण्यात यावा, मेंढीला राष्ट्रीय पशुंचा दर्जा देण्यात यावा, वनकर्मचारी व मेंढपाळ संघर्ष कमी करावा, शासनाने मेंढीला जि पी एस ट्रॅकर बसवून द्यावा असे बोलून दाखवली. या कार्यक्रमाला मा मोहन महाळे रामा महादाळे, माहोन होळकर, संतु संभाडे, मल्लु बिस्मिल्ले, चंद्रकांत महादाळे बाळु संभाडे, माहदु डोळे याच्या परीश्रमतु कार्यक्रम आयोजित करण्यात आले व कुंटूर, कृष्णुर, सोमठाना, बरबडा, मेंढपाळ व पत्रकार बालाजी हनमंते चंदु अंबटवाड उपस्थित होते.
यामध्ये बोलताना मेंढपाळ सुर्याजी पाटील चाडकर म्हणाले मेंढपाळ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असुन त्याला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलायला हवीत,अन्यथा संघर्ष अटळ आहे सासे बोलताना सांगितले व कोनतेही सहकार्य लागल्यास आम्ही तयार आहोत असे म्हणत आहेत. या कार्यक्रमाचे संचालन गुरुजी यांनी के आभार प्रदर्शन चंद्रकांत महादाळे यांनी केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या