कुंटूर येथील स्वच्छतेचे वाजले तिन तेरा !

[ कुंटूर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. आज अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  हगणदारीमुक्तिचा बोजवारा उडला आहे. अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घरा बहारच्या ठिकाणी कचऱ्‍याचे ढीग पहायला मिळत आहेत. “स्वच्छ शहर सुंदर शहर” ही संकल्पना बातम्यापुरतीच सिमीत राहिली आहे. कुंटूर हनुमान मंदिर परीसरात मुस्लीम स्मशान भुमी व रामचंद्र महाराज परीसरातील अनेक दिवसांपासून नालीचे पाणी रस्त्यावर जात आहे. याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तथापि, कुंटूर ग्रामपंचायत आरोग्य विभाग सुस्त आहे नागरिकांच्या समस्यांच निवारण करण्याची प्रशासन, सत्ताधारी लोकांची मानसिकता दिसुन येत नाही.

कुंटूर ची स्वच्छता, नाली साफ सफाई करण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन देखील या नालीचे पाणी जाऊन रस्त्याची दयनीय अवस्था झालेली दिसुन येत असून जीथे तीथे कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे. प्लॅस्टिक कॅरीबॅगाचा सर्रास वापर सुरू आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने राज्याने प्लॅस्टिक वर बंदी घातली आहे. प्लॅस्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करूनसुद्धा प्लाास्टि ची विक्री व वापर सुरूच आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाकडुन “स्वच्छ कुंटूर” साठी गावातील विविध भागांमध्ये मोहिम राबवावी अशी मागणी जनतेतून होत आहे. परिसर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवत असून, या योजनावर कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे‌. अशीच स्वच्छतेची हागणदारीमुक्त गाव योजना शासनाने राबविली. यामध्ये कुंटुर परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र, आजही कुंटूर परिसरातील गावे मुक्त झाली हागणदारीमुक्त झाली नाहीत, याबाबतची कोणत्याही प्रकारची संबंधितांकडून चौकशी करण्यात येत नाही. अनेक गावात केवळ हागणदारी मुक्तीचे फलकच लावण्यात आले असून, अनेक पुरस्कार प्राप्त गावांमधील नागरिक हातात “टमरेल” घेऊन जाताना दिसत आहेत.  कुंटूर परिसरात ही स्थिती पहावयास मिळत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या