कुंटूर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात – सा.बा.वि.व जि.प.बा.विभागाचे दुर्लक्ष !

(विशेष प्रतिनिधी – बालाजी हनमंते कुंटुरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील अनेक रस्ते अतिक्रमाणाच्या विळख्यात अडकलेले आहेत. नायगाव हुन येणा-या रस्त्यावरील शेळगाव, कोकलेगाव, कुंटूर, इकळीमाळ, बळेगाव मार्गे उमरी जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण  झाले आहे.

कुंटूर बसस्थानक उमरी-नरसी मार्गावर असून तिथेच पोलीस ठाणे आहे. प्राथमीक आरोग्य केंद्र, शाळा, बँक, बाजार पेठ, त्यामुळे या ठिकाणी नेहमी गर्दी असते.
या परिसरातील इतर व्यावसायिकांनी तात्पुरते टिनशेड उभारून अतिक्रमण केले आहे तर फळ विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. याच ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात.
त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याची रुंदी वाहतुकीसाठी कमी झाली आहे. या रस्त्याने चालणे व दुचाकी वाहन चालविणे कठीण झाले आहे. कुंटूर मुख्य रस्त्यावर मुख्य रस्ता ते आठवडी बाजार रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून ते हटविण्याची मागणी जनतेतून होत आहे.
होणाऱ्या अतिक्रमणामुळे कोकलेगाव रस्त्यावरील जाणाऱ्या प्रवाशांना अडचण निर्माण होत असून कोकलेगाव येथे सुद्धा लोकं आपले सामान विट, रेती, जळतन रस्त्यावर ठेवतात. गाढव, बैल, म्हैस, रस्त्यावर बांधून अतिक्रमण करत आहेत.
त्यामुळे नागरिकांना खुप त्रास होत असून कुंटूर ते नायगाव रोड अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेला आहे. हा रस्ता तीन तालुक्यास जोडनारा आहे. तरी या कडे कोणाचे लक्षात येत नाही का? या रस्त्यावरुन आमदार, जिल्हा अधिकारी, तहसिलदार, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सार्वजनीक बांधकाम विभाग अधिकारी, असे अनेक अधिकारी जातात मात्र या कडे दुर्लक्ष का?
या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर चालणे देखिल कठीण झाले आहे. परंतु लाखो रुपये खर्च करुन देखील या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या कडे लक्ष देण्याची गरज आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या