नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत चालले असून एकाच महिन्यात तिन जुगार अड्ड्या वर धाड तर ६२ कीलो गांजा जप्त !
पोलीस प्रशासनाचा ढिला कारभार यानिमित्ताने उघडीस आला आहे. कुंटूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे बरबडा, कृष्णुर, राहेर, कुंटूर या बिट मध्ये ४५ गावा मध्ये दिवसेंदिवस अनेक अवैध व्यवसायांनी जम बसवला आहे.
वरील काही ठिकाणी, बनावट देशी विदेशी दारूचे धंदे, वाळु उपसा, गुटखा विक्री, जुगार , वनवट शिंदी, असे अनेक व्यवसायांच्या माध्यमातून गुन्हेगारवृत्तीला खतपाणी घातले जात असताना प्रशासन शांत का आहे? हे एक न उलगडणारे कोडे आहे.
सर्वत्र सहज उपलब्ध होणारा गुटखा यामुळे अवैध व्यवसाय जोरात चालू असल्याचे दिसून येत आहे. गुटखा व दारु, जुगार, बनावट शिंदि, या व्यसनाच्या तरुणांना लोटण्यात जेवढे व्यावसायिक जबाबदार आहेत तेवढेच या व्यवसायांना आतल्या हाताने मदत करणारे प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहे.
युवा पिढी मात्र या व्यसनांच्या आहारी जाऊन कित्येक जणांचे कुटुंब बरबाद झाले आहेत. ठिकठिकाणी सुरू असणारे पोलीस स्टेशन च्या हद्दीत सरासपने चालनारे अवैध धंद्याला पोलिस आळा घालतिल का?
वाहनेही खुलेआम अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही टपरीवर पेट्रोल, बनावट देशी-विदेशी दारु विक्री खुलेआम केली जात आहे. कुंटूर पोलीसांच्या संमतीनेच हे प्रकार चालतात का ?
काही घरांमध्ये अवैध जुगार चालत असल्याची चर्चा आहे. कुंटूर परिसरातील अनेक गावांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक व बनावट देशी विदेशी दारू विक्री, तसेच आकडी मटका हि राहेर व बरबडा, कृष्णुर बिट मधे या मुख्य ठिकाणी राहुनच केला जातो आहे.
वाहनांमध्ये कोंबड्या प्रमाने कोबुन वाहतूक केली जाते आहे. त्यामुळे अनेक आपघात होवून लोक जखमी झाले आहेत. काही प्रवासानातर जिव घेणा प्रवास केला जात आहे.
सदर अवैध वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडुन प्रयत्न केला जात नाही.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एकूण ४५ गावे असुन बावीस महिने कुंटूर ठाण्याचा कारभार सांभाळत असताना एकदमच सहाय्यक पोलीस निरीक्षक के एस पाठाण यांची नांदेडच्या पोलीस मुख्यालयात नुकतीच तोंडी आदेशानुसार बदली झाली.
त्यांच्या काळात चालनारे अवैध धंंद्याला नविन रूजु झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्रेवार यांनी कुंटूर पोलीस स्टेशन हद्दीती ४५ गावाकडे लक्ष देवुन सदर अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नागरीकातुन होत आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy