कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्काराने सुनिता चौहान सन्मानित !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
              76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने मीमांसा फाउंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, ह्युमन राइट्स फाउंडेशन, व मीडिया-पोलीस सोशल क्लब यांच्यावतीने दिनांक 15 रोजी विसावा पॅलेस शिवाजीनगर नांदेड येथे कुंडलवाडी येथील रहिवाशी असलेल्या राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला जिल्हाध्यक्ष तथा “बेटी बचाव बेटी पढाव” या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनिता रघुनाथसिह चौहान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ‘सामाजिक कर्तुत्वान स्त्री’ म्हणून कुसुमताई चव्हाण महिला भूषण विशेष सन्मान पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

              हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तहसीलदार श्रीकांत निळे,सेवानिवृत्त तहसीलदार नरसिंग चौहान,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष डॉ एस एस शेंगुलवार,सुनील बेजगमवार,डॉ विठ्ठल कुडमुलवार, अशोक कांबळे, नरेश जिठ्ठावार, शैलेश ऱ्याकावार, प्रभारी मुख्याधिकारी आर जी चौहान, डॉ नरेश बोधनकर, शेख मुखत्यार, सिनू चौहान, सुभाष निरावार, गंगाधर पत्की, हेमचंद्र वाघमारे, मारोती करपे, प्रकाश भोरे, शंकर जायेवार, मोहन कंपाळे आदीसह सर्व नातेवाईक,मित्र मंडळी, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या