लघुळ नवीन अबादी ते सगरोळी रस्त्यावर त्वरीत मुरुम टाकुन रस्ता दुरुस्ती करा शेतकर्‍याची मागणी !

[ बिलोली – शंकर महाजन  ]
मौजे लघुळ (नवीन अबादी) ते सगरोळी येथील विठ्ठल साखरे यांच्या शेतापर्यंत या महीन्यात दिनाक ६ व ७ तारखेला आतिवृष्टीचे पाउस पडल्या मुळे पुर्ण रस्ता उखडुन गेला आहे.
या मुळे रस्त्यावरील शेतकर्‍यांना चालण्यास व वाहतुकीस  अत्यंत ञास होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्वरीत मुरुम टाकुन तात्पुरता रस्ता तयार करुन द्यावा. या मागणीचे निवेदन सगरोळी परिवर्तन समिती व सगरोळी येथील शेतकरी मारोती बामने, शिवकुमार पा.बाबणे, मारोती सिध्दापुरे, सायगौंडा म.आंबे, राजु बामने आदी शेतकार्‍यांनी केली आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या