लखिमपुर खिरी येथील शेतकरी नरसंहाराचा निषेध करत म्हसळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन !

[रायगड/म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे]

म्हसळा दिनांक 6/10/2021 बुधवार रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले साहेब व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या आदेशानुसार म्हसळा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उत्तरप्रदेशातील लखिमपुर खिरी येथील शेतकरी नरसंहाराचा निषेध करणे तसेच शेतकऱ्यांचे मारेकरी असलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन दिघी नका म्हसळा येथे म्हसळा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष श्री डॉ मोइज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष श्री बाबा हुरजुक रफ़ी घरटकर म्हसळा शहर युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष सुफियान हळदे, महिला शहर अध्यक्ष नाजिमा मुकादम, जफ़रमिया नजी मिया, अशपाक काठेवाड़ी बाबासाब जमादार, इनायत शेठ, कॉंग्रेस चे जेष्ठ नेते रवी दळवी व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉंग्रेस च्या नेत्या प्रियंका गांधी या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाना भेट ण्यासाठी जाताना तेथील पोलिसांनी त्यांना धकाबुकि करण्यात आला असा कॉंग्रेस कडून आरोप करण्यात आला आहे. त्या घटनेचे पडसाद देश भर उमटले. म्हसळयात ही कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उत्तरप्रदेश सरकारविरोधी संताप व्यक्त करुण, सरकारविरोध आपला लढा असाच चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या