लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ लोहा शहर कडकडीत बंद !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]

आज लोहा शहरातील बाजारपेठ, कडकडीत बंद करून केंद्र सरकारचा निषेध केला. व्यापा-यांनी आपली दुकाने, प्रतिष्ठापने बंद केली. उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी येथे शेतकरी आंदोलनात देशाचा पोशिंदा शेतकरी यांनी न्याय मागण्यासाठी आंदोलन केले. त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून आठ शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दर्शवत आज महाविकास आघाडी तर्फे लोहा शहरात नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा पंचायत समिती सदस्य नवनाथ(बापू) रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वात कडकडीत बंद करण्यात आले.
यावेळी उपस्थित नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,माजी शिक्षण व बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संजय पाटील कराळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक उत्तम महाबळे, शिवसेनेचे बाळू पा.कराळे, शेकापचे श्याम अण्णा पवार, हळदव चे माजी सरपंच भीमराव पा.शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रभाकर पवार,  शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद पाटील पवार, भारत पा.पवार, शिवणी (जा.) चे सरपंच छत्रु महाराज, सुजित चव्हाण, युवराज वाघमारे, चंद्रकांत आडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राहुल लोंढे, चितळीचे मा.सरपंच शिवराज पाटील पवार, दगडसांगवीचे माजी सरपंच संतोष पाटील फाजगे, नंदू पाटील लुंगारे, राम पवार, सूर्यकांत चव्हाण, सुनिल जामगे, मारुती चव्हाण, महेश चव्हाण, कैलास कहाळेकर, शिव काकडे, रुषी श्रीमंगले, कल्याण जामगे, प्रताप वाकडे, प्रसाद जाधव, गजानन कराळे, स्वप्निल पांचाळ, सचिन कल्याणकर, बंटी, शिवराज दाढेल, सचिन दंमकोंडवार व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या