म्हसळयात महाविकास आघाडी च्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]

म्हसळा येथे काँग्रेस, शे.का.प. आणि शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन व्यापाऱ्यांना केलेल्या बंदच्या आवाहनाला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद देऊन बंद ठेवत लखीमपूर येथील झालेल्या शेतकरी हत्तेचा जाहीर निषेध करत पाठिंबा दिला.

हा बंद यशस्वी करण्यासाठी म्हसळा तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ मोइज शेख, शिवसेनेचे मा.तालुका अध्यक्ष महादेव पाटिल, शेकाप चे नेते श्री संतोष पाटिल, कॉंग्रेस शहर अध्यक्ष बाबा हरजुक, रफ़ी घरटकर, महिला शहर अध्यक्ष नाजिमा मुकादम, म्हसळा शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुफियान हळडे, शिवसेनेचे नेते सुरेश कूडेकर, बाळ करड़े, नाथूराम खोत, श्री अक्रम साने, श्री मात्रे, कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते जहूरभाई हरजुक, कॉंग्रेस, शिवसेना, शेकाप या तीनही पक्षाच्या शिष्टमंडळाने म्हसळा तहसिलदार श्री घारे साहेब यांना निवेदन दिले. कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या