लालवंडी सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी भगवानराव लंगडापुरे यांची बिनविरोध निवड

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
लालवंडी येथील माजी सरपंच मा.भगवानराव लंगडापूरे व व्हॉइस चेअरमन बाबुराव बोमवाड यां सर्वानुमते बिनवीरोध निवड झाली. लालवंडी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत चेअरमनपदी भगवानराव लंगडापुरे व व्हाईस चेअरमन बाबुराव बोमवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदस्य म्हणून विश्वनाथ केरुरे ,नागोराव इंद्रे,सतीश केरूरे ,अरविंद लालवंडे ,माधव पुपलवाड, गणपत जोंधळे ,मारुती भुसेवाड, पंचफुलाबाई बोमनाळे, राधाबाई हाके ,गावकर्यांच्या वतीने निवडल्या आलेल्या सर्व सोसायटीच्या सदस्यांचे स्वागत करण्यात आले निरीक्षक अधिकारी श्री.करखेले आणि श्री.गादेवार तसेच संचालक मंडळाचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.जीवन चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी माजी जि.प.सदस्य बाबूराव लंगडापूरे आणि अॅड.नारायण लंगडापूरे जीवन चव्हाण, रमेश पाटील शिंदे ,राजेश लंगडापुरे, बालाजी बामनपल्ले, गुणवंत लालवंडे, प्रकाश केरुरे, शिवाजी केरुरे, नामदेव संगेपवाड, दत्ता रूद्रावाड,यांचाही गावकर्यांनी सन्मान केला तर निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या