स्वर्गीय जनार्दन नारायण म्हात्रे “रंगमंच उद्घाटनाचा सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख व कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
शिवजयंती उत्सवानिमित्त शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी रा.जी.प.प्रार्थमिक शाळा मानी-भूते साठी आवश्यक असलेला एक सुसज्ज असा “स्वर्गीय जनार्दन नारायण म्हात्रे” रंगमंच गावातील निस्वार्थी समाजसेवक श्री.महेश जनार्दन म्हात्रे यांच्याकडुन स्वखर्चाने शाळेस समर्पित करण्याचा व त्याच्या उद्घाटनाचा सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख व कार्यसम्राट आमदार श्री.महेद्रशेठ दळवी यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.

त्याप्रसंगी प्रमूख पाहूने म्हणून रा.जि.प.च्या आक्रमक व कार्यतत्पर सदस्या सौ.मानसीताई दळवी,शिवसेनेचे अलिबाग उपतालुकाप्रमूख श्री.मनिषदादा पाटील, वायशेत केंद्रप्रमुख श्री.रमाकांत पाटील,ग्रूप ग्रामपंचायत मानतर्फे झिराडच्या प्रथम नागरीक सरपंच सौ.अस्मिता अनिल म्हात्रे व उपसरपंच श्री.राकेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या