लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या यिन अध्यक्षपदी संतोष साखरे !

धर्माबाद : सकाळ माध्यम समुहाच्या यंग इन्सिपरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे घेण्यात आलेल्या महाविद्यालय स्तरावरील दुसऱ्या टप्यातील निवडणूकीचा निकाल शुक्रवारी (ता. 24) ऑनलाईन जाहीर झाला. यिन (YIN) च्या अध्यक्षपदी संतोष साखरे (एमएस्सी द्वितीय वर्ष) तर उपाध्यक्षपदी अविनाश ताडोड (बीए तृतीय वर्ष) हे निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारसह विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. पहिल्यांदाच अध्यक्ष व‌ उपाध्यक्षांची निवड ऑनलाईन मतदान पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोचली होती.
 या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पि. सुशिला, उप-प्राचार्य डॉ.श्रीराम गव्हाणे, निवडणूक संयोजक प्रा.संभाजी मनूरकर, यिन‌ जिल्हा समन्वयक श्री.वडजे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या