आयुष्यावर बोलू काही !

[ शब्दांकन- प्रियंका ]
आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. कधी जे आपल्याला हवं असत ते मिळत नाही आणि जे मिळत ते नको असत पण जे ही काही मिळालय त्यामध्ये सुख मानणारे काही जण असतात तर काही जण जे मिळालंय त्या मध्ये जराही आनंदी नसतात तर काही जण असतात जे नशिबावर सोडून देतात आणि जेही आहे आता तेच आहे हे समजून आपलं आयुष्य सुखी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगत असतात.
आपण ही असंच सुखी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं पण ह्या साठी मनाच्या छोट्याश्या कोपऱ्यात कुणासाठी तरी तो soft corner असतोच ना तो फक्त एकांतात सर्व काही आठवून क्षणिक सुख देऊन जातो. तो मनात तसाच ठेवायचा म्हणजे चाललेल्या आयुष्यामध्ये काही ही अडचण येणार नाही.
काही झालं तरी आयुष्य मात्र मजेत आणि आनंदी जगायचं काय माहित आजच्या पेक्षा वेगळं काही उद्या असेल काही नवीन अनुभव मिळतील नवीन माणसाची ओळख होईल किंवा काही जुन्या आठवणी कुणामार्फत ताज्या होतील.
प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जातो. ते कधी आपल्याला कळत तर कधी नकळत होत. पण होत आपल्याला प्रत्येक क्षण काहींना काही शिकवून जातच असतो. मोठी माणसं तर आपल्याला खुप काही शिकवतात पण लहान मुलं, प्राणी, पाखरे असा हा निसर्ग आपल्याला पावलोपावली आयुष्याच गणित कस सोडवायचं हे सांगतच असतो.
प्रत्येक क्षण हा आनंदासाठी असतो असं ही नाही. दुखः मागून आलेलं सुख खुप आनंददायी असत, म्हणून जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळालीच पाहिजे हा अट्टाहास काय कामाचा.
जर ती तुमची नाही झाली पण कुठेतरी ती सुखरूप आनंदी आहे हे समजून तिच्यासाठीचा तो soft corner तसाच राहू द्या म्हणजे त्याचा तुम्हालाही त्रास होणार नाही. असं समजा की त्या आनंदातच आपला आनंद आहे. म्हणजे आयुष्यात काहीच अडचणी येणार नाहीत,कारण जीवन खुप सुंदर आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या