कर सल्लागार राहुल पाटील ममदापूरकर यांना नाशिक येथे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

[ विशेष प्रतिनिधी- गोविंद बिरकुरे ]
निर्वाण फाऊंडेशन, नाशिक यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असते.यामध्ये महाराष्ट्र राज्यामधुन GST आणि Income Tax क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीची निवड करुन पुरस्कार दिला जातो.
या वर्षीचा मानाचा सावित्रीज्योती सन्मान राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारासाठी उत्कृष्ट कर सल्लागार राहुल पाटील ममदापूरकर यांची निवड करुन त्यांना अभिनेते मा.प्रशांत गरुड(झी मराठी फेम) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पश्चिम आफ्रिकेचे स्काॅलर मा.किटॅनो दज्ता, पश्चिम आफ्रिकेचे मा.गॅब्रियल सिल्वा, अभिनेत्री मा.पल्लवी पटवर्धन तसेच नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी मा.डाॅ.एम.बी.देशमुख साहेब यांची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या