उमरीचे पत्रकार गिलचे यांचा मुलगा पुरात वाहून जाताना बाल बाल बचावला ! स्थानिकांनी वाचविले प्राण !

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )

   ● तोरणा परिसरातील गावकऱ्यांचे कौतूक
   ● अभियंता मनेष गिलचे यांना जीवदान .
   ● अंदाजे दोन लाखाच्या वर रक्कम, मोटारसायकल, कागदपञे वाहून गेली !

 उमरी शहरातील पत्रकार पी.जी. गिलचे (सर) यांचे सुपुत्र अभियंता मनेष गिलचे हे मुसळधार पावसातील पुरात वाहून जाताना दिनांक ११.०७.२०२१ रोजी तोरणा परिसरातील गावक-यांमुळे बाल बाल बचावले. आणि वाहुन गेलेली मोटारसायकल दुस-या दिवशी सकाळी दिनांक १२.०७.२०२१ रोजी गावक-यांनी ओहोळातुन शोधुन काढली. 

 मनेष गिलचे यांच वय २७ वर्ष, धंदा-अंभीयता म्हणून हायवे रोड किनवट ते लोहा – अंतर्गत बिलोली तालुक्यात कामे करून पाहणी करीत गाडी नंबर एम.एच. २६ झेड २०१४ घेऊन तोरणा पुल रस्त्याने उमरी गावाकडे येत असतांना अचानक मुसळधार पाऊसाच्या बरसातीने तोरणा पुलावर पुर आल्याने मनेष गिलचे मोटारसायकल सह पुरात वाहून गेले.आणि जवळच्या एका लिंबाच्या झाडावर अडकून बसले.

त्यांच्या सोबत अंदाजे दिड ते दोन लाखाच्यावर रोख रक्कम होती.सदर रक्कम बॅग मध्ये होती असे मनेष गिलचे यांनी पुरातुन गावकर्‍यांनी वर काढल्यावर सांगीतले.

तोरणा, दुगाव, कुंभारगांव येथील तरूणांनी अतिशय धाडसाने, पुराच्या पाण्यात उतरुन दोरीच्या सहाय्याने पुरात झाडावर अडकून पडलेल्या तरूणास सुखरूप बाहेर काढले.

पुरात पडलेला मनेषने योगा योग लिबांच्या झाडाचा अचानक सहारा घेवून चाणक्य बुद्धीने स्वतःचा प्राण वाचवून मोबाईल व्दारे आई – वडील, आणि कंपनीचे मालक यांना पुरातील झाडावरूनच “माझा जीव वाचवा” असा आक्रोश करीत संपर्क केला.

सतर्क गावक-यांनी अखेर पर्यंत ध्यैर्याने मनेष गिलचे यांचे प्राण वाचवले. त्यामुळे प्रशासन त्यांच कौतुकच करीत आहे. पण मनेष गिलचे यांचे आई – वडीलांनी देखिल “गावकर्‍यांचे उपकार विसरणार नाही असे उद्गार काढले आहे”.
 घडलेली सर्व घटना Arunkumar Suryawanshi या फेसबुक अकाऊंट वर लाईव्ह केलेली आहे.
प्रसिद्ध जेष्ट पत्रकार पी .जी . गिलचे यांच्या घरी मित्रमंडळी नातेवाईक यांची मनेष ला भेटण्यासाठी रांग लागली आहे .

ताज्या बातम्या