१०० टक्के वीज बिलाची वसुली करा – मुख्य अभियंता श्री.सुरेश गणेशकर
■ मुख्य अभियंता श्री. गणेशकर यांनी घेतली पनवेल विभागाच्या लाईनस्टाफची आढावा बैठक !
(ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते)
दि. १८ फेब्रुवारी २०२१-
दिवसंदिवस वाढत चाललेली महावितरणच्या वीज बिलाची थकबाकी व वसुलीबाबत, तसेच लाईनस्टाफला अजून वेगाने काम करण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री.सुरेश गणेशकर यांनी पनवेल विभागातील भिंगारी, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, उरण येथील लाईनस्टाफची आढावा बैठक आज दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजी पनवेल विभागीय कार्यालयात घेतली.
यावेळी,वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. राजाराम माने,पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
महावितरण भांडूप परिमंडलातील अनेक ग्राहकांनी एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाहीत. भांडूप नागरी परिमंडलात लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरघुती तसेच सार्वजनिक विभागातील १ लाख ६३ हजार ग्राहकांकडे एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या वीज बिलाची १७५.४७ कोटी रुपयांची थकबाकी होती.
यामध्ये पनवेल विभागातील ग्राहकांकडे ३४ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकीचा समावेश आहे. महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली असून ज्या ग्राहकांनी एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत एक ही वीजबिल भरले नाहीत अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम दिनांक ०१ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु आहे. तसेच वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पनवेल विभागात दहा दिवसाच्या वसुली नंतर सध्या १४ कोटी ३६ लाखाची थकबाकी आहे.
पनवेल विभगातील भिंगारी, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, उरण येथील एकूण ७५५६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्याची स्तिथी लक्षात घेऊन, महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी ही मोहीम अजून तीव्र करून युद्धपातळीवर वीज बिलाची वसुली करण्याबाबत सूचना करण्यसाठी व लाईनस्टाफना चांगली कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता येथील लाईनस्टाफची आढावा बैठक घेतली. यावेळी, खारघर उपविभागाने १००% ग्राहकांची वीज जोडणीची तपासणी केल्याबद्दल शाखा अभियंता गौरी वजरकर व त्या उपविभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.