लिंबोटी धरणाची पाईप लाईन ठरतेय कुचकामी; पारडी येथील शेतकऱ्यांचा तक्रारींचा पाऊस!

( विशेष प्रतिनिधी /रियाज पठान )

लोहा तालुक्यातील महाकाय असलेल्या लिंबोटी धरणामुळे संबंध तालुका सुजलाम सुफलाम होत असताना मात्र लोहा तालुक्यातील पारडी येथील शेतकऱ्यांना कॅनॉल मार्फत देण्यात आलेले पाईप लाईन कुचकामी ठरल्याचे समोर आले असून 30 एकर शेतीसाठी एक पॉईंट अपुरा ठरत आहे.काही ठिकाणच्या पॉईंटला कमी दाबणे पाणीपुरवठा तर काही ठिकाणी जास्त दाबाणे पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे पाण्यासाठी भावाभावामध्ये भांडण तंटे वाढले आहेत.

लिंबोटीं धरणाच्या कॅनॉल खालील शेतकऱ्यांच्या तक्रारीं मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. लिंबोटी धरण हे लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणारे ठरत असले तरी लोहा शहराजवळ असलेल्या पारडी शिवारातील पाईप लाईन मात्र कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

30 एकर शेतीसाठी एक पॉईंट सोडण्यात आला आहे.काही ठिकाणी पाणी जादा गतीने येत आहे तर काही ठिकाणी पाण्याचे प्रेशर अत्यंत कमी दाबाने येत असल्यामुळे अनेक दिवस शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करणे अवघड होऊन बसले आहे.अनेकांचे ठराविक वेळेत पाणी देणे होत नसल्यामुळे भावाभावात भांडण तंटे उद्भवत आहेत.

पारडी येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रमांक 2 जंगमवाडी, नांदेड याठिकाणी वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊन सुद्धा संबंधित प्रशासन यावर कोणतीच कार्यवाही किंवा उपायययोजना करीत नाही.

शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ सदरील समस्या सोडवावी अशी मागणी पारडी येथील शेतकरी अंगद रामजी डिकळे, रंगनाथ गणपती डिकळे, राजू नागोराव डिकळे, व्‍यंकटी रामजी डिकळे, पंढरी संभाजी पवार, आदींसह अनेकांनी केली आहे.

ताज्या बातम्या