लिंगायत महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन ; बिलोलीत बुधवारी व्यापक बैठकीचे आयोजन

( बिलोली ता. १२ बातमीदार )
 तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने चार जून 2023 रोजी लिंगायत समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व या समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी यासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जास्तीत जास्त लिंगायत समाजाला सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (ता१२) बिलोलीत बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते.
लिंगायत समन्वय समितीचे तेलंगणा अध्यक्ष शंकर पाटील लिंगायत धर्म महासभेचे अध्यक्ष विजयकुमार पटने अॅड दिनेश पाटील, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक तथा बसव ब्रिगेडचे प्रमुख अॅड अविनाश भोसीकर, बसव ब्रिगेड जिल्हा संघटक शंकर पाटील महाजन, कृष्णा इंद्राक्ष, विपुल पटणे, ओम पाटील हुनगुंदेकर, पिंटू बोंबले रत्नाकर कुराडे,शिवा शिवशट्टे,आमोल पाटील,नागनाथ बोडके, आनिल मुडंकर,यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या महामोर्चाचे नेतृत्व तेलंगणातील खासदार बी बी पाटील हे करणार असून महामोर्चाच्या नियोजनासंबंधी बिलोली येथे बुधवारी (ता१७) व्यापक बैठक आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त लिंगायत बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन बसव ब्रिगेड जिल्हा संघटक शंकर पाटील महाजन सगरोळीकर यांनी केले आहे. 
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या