धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या संयोजनाखाली सुरू असलेल्या लॉयन्सचा डबा उपक्रमाचा प्रवीण साले यांच्या हस्ते समारोप !

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी आनंद सुर्यवंशी)
नांदेड जिल्ह्यात बारा दिवसाच्या दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या संयोजनाखाली सुरू असलेल्या लॉयन्सचा डबा या उपक्रमाचा नांदेड रेल्वे स्थानकावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते रविवारी जेवणाचे डबे व मिनरल वाटर वितरीत करून समारोप करण्यात आला.
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल व नांदेड अन्नपूर्णातर्फे पंचवीस मार्चपासून चार एप्रिल पर्यंत रेल्वे स्थानक, बस स्थानक ,वाडिया फॅक्टरी, डॉक्टर लेन,शासकीय रुग्णालय परिसरात चार हजार पेक्षा जास्त डबे लोकसहभागातून वितरित करण्यात आले.
यामध्ये लॉयन्स परिवाराचा वीस टक्के तर समाजातील इतर दानशूर नागरिकांचा ऐंशी टक्के वाटा होता. गेल्या वर्षी देखील लॉकडाउनच्या बावन दिवसात बत्तीस हजारापेक्षा जास्त लॉयन्सचे डबे वितरित करण्यात आले होते. यावेळी शेवटच्या सहा दिवसात नवीन डबे देणाऱ्यामध्ये कै.रुख्मिणीबाई कोथळीकर यांच्या स्मरणार्थ दोनशे डबे,कै.सुलोचनाबाई अमरसिंग चौहान यांच्या स्मरणार्थ एकशे सत्तर डबे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळी कडून दीडशे डबे वाटप करण्यात आले. प्रत्येकी शंभर डबे देणाऱ्या मध्ये मयंक दिलीप पंढरपूरकर,रेणुका जयप्रकाश सोनी, लॉ.डी. पी. थेटे ,डॉ.निषाद नानासाहेब जोशी,तन्वी यांच्या वाढदिवसानिमित्त विकास लव्हेकर, लिंबाजीराव श्रीरंगराव कटारे झरी बोरी जि.परभणी, लॉ.जयेश ठक्कर, गोविंदराव दिगंबर मरेवाड,मारुती कदम सोनखेड यांचा समावेश आहे.स्नेहा करवा आणि भास्कर रामचंद्र खिर्डेकर बी अँड सी कॉलनी यांनी प्रत्येकी सत्तर डबे दिले आहेत.लॉ.प्रा. दीपक बच्चेवारसर, दिलीप पाटील राजश्री पब्लिक स्कूल,गोविंद कपाळे, अशोक पिल्लेवार,जितेंद्र अग्रवाल,भैरव पाटील मारतळा,मनीषा चाडावार राजकॉर्नर, भगवानदास गोविंदप्रसाद आसवा उमरी, उमाकांत तोटावार भाग्यनगर,कुमार कुलकर्णी यांच्यातर्फे प्रत्येकी पन्नास डबे वितरित करण्यात आले. याशिवाय सतीश काशिनाथ गाणू पस्तीस डबे,माधव बोडके तीस डबे,सुरेश रामराव पावडे अष्टविनायकनगर वीस डबे, ज्ञानेश्वर पईतवार सतरा डबे देऊन सहकार्य केले.
नगरसेवक बालाजीराव जाधव यांच्यातर्फे कै.पद्मीनबाई विठ्ठलराव जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीनशे डबे पाच मे रोजी वितरित करण्यात येणार आहेत. समारोपाच्या दिवशी अर्धा लिटरच्या मिनरल वॉटरच्या बाटल्या अरुणा अरुण कुलकर्णी, ॲड.सी.बी.दागडिया,डॉ.निषाद नानासाहेब जोशी यांच्यातर्फे वितरित करण्यात आल्या.सौ.पूनम सचिन काबरा व सौ.अर्चना आशिष काबरा यांच्यातर्फे प्रत्येकी पाचशे सॅनिटायझर ट्यूब लॉकडाऊनच्या काळात वितरित करण्यात आल्या.
बारा दिवस चाललेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, सचिव लॉ.ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू, प्रोजेक्टर चेअरमन लॉ.अरुणकुमार काबरा यांच्यासह लॉयन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे अध्यक्ष लॉ. नागेश शेट्टी,सचिव लॉ.धनराजसिंह ठाकूर,कोषाध्यक्ष लॉ. अनिल चिद्रावार,प्रोजेक्टर चेअरमन राजेशसिंह ठाकूर, मन्मथ स्वामी यांनी परिश्रम घेतले. जर दुर्दैवाने भविष्यात लॉकडाऊन लागले तर खऱ्या गरजूंना जेवणाचे डबे वितरित करण्याचे काम लॉयन्स परिवाराकडून करण्यात येईल अशी ग्वाही संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या